मुलगा न झाल्याने निगडीतील विवाहितेचा सासरच्यांकडून छळ

0
891

निगडी, दि. १८ (पीसीबी) – लग्नात दोन लाख रुपये आणि कार न दिल्याने तसेच लग्नानंतर मुलगी झाल्याने चारित्र्यावर संशय घेत सासरकडच्या मंडळींनी विवाहितेचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे. ही घटना १७ एप्रिल २०१६ ते १४ फेब्रुवारी २०१७ दरम्यान ए/जी/२ अशोका म्युज कोंढवा खुर्द येथे घडली.

याप्रकरणी पीडित २६ वर्षीय विवाहितेने सासरकडच्या मंडळींविरोधात निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार पती माज फैय्याज शेख, सासू रफत फैयाज शेख, सासरा फैय्याज बशरत शेख आणि चुलत सासरा फैजल बरशत शेख (सर्व रा. ए/जी/२ अशोका म्युज कोंढवा खुर्द) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत २६ वर्षीय विवाहितेचे एप्रिल २०१६ मध्ये माज शेख याच्यासोबत विवाह झाला होता. ती सासरकडच्या मंडळींसोबत कोंढवा येथे राहत होती. मात्र लग्नात दोन लाख रुपये आणि कार न दिल्याने तसेच लग्नानंतर मुलगी झाल्याने पती माज, सासू रफत, सासरा फैय्याज, चुलत सासरा फैजल यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार शारिरीक आणि मानसिक छळ केला. तसेच पीडितेला घरातून हाकलु तिच्या वडिलांनी स्त्रीधन म्हणून दिलेले ६ तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलिस ठाण्यात पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. निगडी पोलिस अधिक तपास करत आहेत