मुलगा जे करू शकतो, ते केले आहे, आता बापाने द्यायचे आहे – चंद्रकांत पाटील

0
953

मुंबई, दि. २० (पीसीबी) –  मुलगा जे करु शकतो, ते करत आहे आणि बापाने जे द्यायचे आहे, ते बाप देईल, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी   धनगर आरक्षणासंदर्भात  राज्य  सरकारची भूमिका आज (मंगळवार) विधानसभेत मांडली.   

धनगर आरक्षणाबाबतचा  ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’चा (टीस) अहवाल  प्राप्त झाला आहे. धनगर आरक्षण देण्यासाठी केंद्राची परवानगी हवी आहे, याबाबत पत्र लिहून केंद्र सरकारला कळवले आहे, असे चंद्रकांतदादा यांनी सांगितले. धनगर आरक्षणाचा अहवाल घेऊन आम्ही केंद्रीय ओबीसी आयोगाकडेही जाणार आहोत. आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री बुध्दीवान  आहेत. ते विचार करुन बोलले आहेत. आमच्या हातात जे आहे ते आम्ही केले आहे. जे केंद्राच्या अखत्यारीत आहे त्याबाबत पाठपुरवठा सुरु आहे. मुलगा जे करु शकतो ते करत आहे, जे बापाने द्यायचे ते बाप देणार, असे पाटील म्हणाले. धनगर आरक्षणाबाबत आम्ही दिल्लीत आदिवासी आयोगाकडे जाऊन पाठपुरावा करू, असे आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.