Maharashtra

मुनगंटीवारांना अज्ञानी, अशिक्षीत आणि तिरस्करणीय

By PCB Author

December 31, 2021

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी अधिवेशनात महाराष्ट्र विध्यापीठ सुधारणा विधेयकावर आक्षेप घेतला होता. एलजीबीटीक्यु लोकांनाही विद्यापीठ बोर्डावर सदस्य म्हणून घेण्यास परवानगी देण्यासंबधित हे विधेयक होतं. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने देखील सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली होती.

मुनगंटीवारांनी अधिवेशनात या विधेयकावर आक्षेप घेतल्याने अनेकांनी त्यांना ट्रोल केले होते. सोनम कपूरने येस वुई इक्झिस्ट इंडिया या इन्स्टाग्राम पेजवरची एक पोस्ट शेअर केली होती. पोस्ट शेअर करत तीने मुनगंटीवारांना अज्ञानी, अशिक्षीत आणि तिरस्करणीय म्हटलं होतं.

अधिवेशनात मुनगंटीवार यांनी एलबीजीटीक्यु समुदायातील लोकांना विद्यापीठ समितीचे सदस्य म्हणून घेण्यास विरोध केला होता. “आता तुम्ही लेस्बियन आणि गे लोकांना विद्यापीठ समीतीचे सदस्य म्हणून घेणार का? जर एखाद्या व्यक्तीचे प्राण्यासोबत संबंध आहेत तर तो प्राणी तुम्हाला येऊन सांगणार आहे का?,” असा प्रश्न त्यांनी विचारला होता.

दरम्यान, सोनल कपूर नेहमी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. ती अनेक सामाजिक विषयांवर आपले मत मांडताना दिसून येते. अनेकवेळा ती यामुळे ट्रोलही झाली आहे. मात्र, तरीही सोनमने आपले मत व्यक्त करणं थाबंवल नाही. यावेळीही तिने बेधडकपणे एलबीजीटीक्यु समुदायाच्या बाजूने मत माडलं आहे.