मुतारी बाहेर लघुशंका करणाऱ्यावर कारवाई करा; थेरगाव सोशल फाऊंडेशनच्यावतीने ‘ड’ प्रभागास निवेदन

0
476

पिंपरी, दि, १३ (पीसीबी) – काळेवाडी उड्डाण पुलाखालील सार्वजनिक मुतारी कायम अस्वच्छ असते, तीची वेळोवेळी साफसपाई करण्यात यावी, तसेच स्वच्छता नसल्याने नागरिक मुतारीच्या बाहेर लघुशंका करतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी, थेरगाव सोशल फाऊंडेशनच्यावतीने ‘ड’ प्रभाग अधिकार्री बेंडाळे यांना  निवेदन देण्यात आले.

यावेळी अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, अमोल शिंदे, सचिन झरेकर, यश कुदळे आदी उपस्थीत होते.

निवेदनातम्हटल्याप्रमाणे, काळेवाडी उड्डाण पुलाखालील सार्वजनिक मुतारी कायम अस्वच्छ असते, मुतारीच्या आजुबाजूला पाणी साठत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच मुतारी घाण असल्याने नागरिक मुतारी बाहेरी लघुशंका करतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, मुतारी रोज साफसफाई व्हावी तिथे औषध फवारणी वेळोवेळी करावी अशी मागणी थेरगाव सोशल फाऊंडेशन कडून करण्यात आली आहे.