मुठा कालवा दुर्घटना: दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी   

0
574

पुणे, दि. २८ (पीसीबी) – दांडेकर पूल परिसरातील मुठा कालव्याचा डागडुजीच्या कामात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर   दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

यावेळी पवार म्हणाले की, मुठा कालवा हा सिमेंट काँक्रीटऐवजी मातीचा भराव टाकून तयार केला आहे. मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना कालव्यातून गाळ उपसण्याची कामे वेळोवेळी करून घेतली होती. या कालव्याच्या डागडुजीसाठी जलसंपदा विभागाने पुणे महापालिका प्रशासनाकडे २ कोटी रुपये निधीची मागणी केली होती. परंतू त्याकडे  प्रशासनाने दुलर्क्ष केल्याचे मला समजले आहे.

या घटनेसाठी जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली पाहिजे. दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे, जेणेकरून त्यांना पुन्हा कामाचे कंत्राट मिळणार नाही, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली. गलथान कारभारामुळे वाया गेलेल्या पाण्याची नुकसानभरपाई जलसंपदा विभाग किंवा महापालिकेने भरून द्यावी, असेही ते म्हणाले.