Desh

मुझफ्फरनगर दंगल प्रकरणी सात जणांना जन्मठेपेची शिक्षा

By PCB Author

February 08, 2019

दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – मुझफ्फरनगर येथील कवाल या गावात २०१३ साली झालेल्या दंगलीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मुझम्मिल, मुझस्सिम, फुकरान, नदीम, जहांगिर, अफझल आणि इक्बाल अशी या दोषींची नावे आहेत.

मुझफ्फरनगर येथे २०१३ साली दंगल झाली होती. या दंगलीत गौरव आणि सचिन या दोघांच्या हत्येप्रकणी कनिष्ठ न्यायालयाने सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हिमांशू भटनागर यांनी हा निर्णय दिला. बुलंदशहर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडली. सुरक्षेअभावी सर्व दोषींना न्यायालयात नेता आले नाही आणि शेवटी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली.