Desh

मुख्य सचिव मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्यासह ११ आमदारांना नोटीस 

By PCB Author

September 18, 2018

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – मुख्यमंत्री निवासस्थानात मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना  केलेल्या मारहाणप्रकरणी दिल्लीच्या पतियाला हाऊस न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह इतर ११ आमदारांना नोटीस  पाठवली आहे. या सर्वांना २५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

मुख्यमंत्री निवासमध्ये १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना ‘आप’ च्या आमदारांनी मारहाण करून  त्यांच्यासोबत गैरवर्तणूक केली, असा आरोप आहे. याप्रकरणी १३ ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह इतर  ११ आमदारांचा आरोपपत्रात समावेश आहे.

या प्रकरणी १५३३ पानांचे आरोपपत्र पतियाला हाऊस न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण १३ जणांना आरोपी बनवण्यात आले आहे. तर केजरीवाल यांचे तत्कालीन मुख्य सल्लागार व्ही. के. जैन यांना साक्षीदार करण्यात आले आहे.