मुख्यमंत्र्यांनी गिरीष बापटांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी – धनंजय मुंडे

0
408

बीड, दि. १९ (पीसीबी) – बिभिषण माने या दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला पदाचा गैरवापर करून बेकायदेशीररीत्या परवाना देण्यात आला आहे. या प्रकरणी पदाचा गैरवापर केल्याबद्द्ल अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.