मुख्यमंत्र्यांना कोणी तरी समजवावे लागेल, संधी दिली तर मी समजावून सांगतो – पृथ्वीराज चव्हाण

0
525

मुंबई,दि.२२(पीसीबी) – नागरिकत्व सुधारणा कायदा हा फार गहन विषय आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याचं जाहीरपणे तरी समर्थन करु नये. या कायद्याबाबत उद्धव ठाकरेंना कोणी तरी समजवावे लागेल, संधी दिली तर मी समजावून सांगतो, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चौव्हाण म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या सीएए समर्थनाला काँग्रेसने विरोध केला आहे. सीएएला आम्ही विरोध करत असून राष्ट्रपातळीवर आमच्या पक्षाची जी भूमिका आहे, तीच राज्यात असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील विसंगती दिसून येत आहे.

नागरिकत्व कायद्याला घाबरण्यासारखे काही नाही, शिवसेना या कायद्याला समर्थन करते, असं उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

दरम्यान, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सुची(एनपीआर) या मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, यावरुन महाविकास आघाडीत धुसफूस निर्माण झाल्याचं दिसत आहे.