Maharashtra

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसमोर निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण

By PCB Author

August 03, 2019

नागपुर, दि. 3 (पीसीबी) – नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसमोर काळे झेंडे दाखवून निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकत्यांना भाजप कार्यकत्यांनी मारहाण करून तेथून हुसकावून दिले. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत निदर्शन करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

‪मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू असून या यात्रेसमोर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे हे निदर्शने करणार असल्याची माहिती नागपुर पोलिसांनी मिळाली. त्यामुळे पोलिसांनी लोंढे यांना पहाटे ताब्यात घेतल्याची माहिती समजते आहे.