Notifications

मुख्यमंत्र्यांच्या निगडी प्राधिकरणातील सभेची तयारी पूर्ण; वाहने पार्किंगची चोख व्यवस्था – आमदार लक्ष्मण जगताप

By PCB Author

November 02, 2018

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर शनिवारी (दि. ३) होणाऱ्या सभेची पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेला मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघातील एक लाखांहून अधिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्राधिकरणातील काही रस्त्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले असून, तीन ठिकाणी मोठ्या जागेत वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.