मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक ‘या’ भाजप नेत्याने केले

0
254

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तेजस ठाकरे यांनी महाराष्ट्राची मान उंचवण्याचं काम केलं असल्याचं शेलार यांनी म्हटलंय.

शेलार त्यांच्या ट्विटमध्ये लिहितात, “जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी “हिरण्यकेशी”प्रजाती शोधली. त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे ! ग्रेट!”
दरम्यान, नेहमी मुख्यमंत्री उध्दव ठाकेर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत परखड टीका कऱणारे आशिष शेलार तेजस याचे कौतुक करत असल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. शेलार यांनी राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवून अगदी मोठ्या मनाने तेजस यांचे कौतुक केले आहे.