मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर आम्हाला आनंदच – विजय वडेट्टीवार

393

मुंबई,दि.१६(पीसीबी) – शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर आम्हाला आनंदच आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

सारखा-सारखा हा प्रश्न का विचारला जातो, की मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का? मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद झाला होता. त्यामुळे निश्चितच शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे, असं . राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत हे लढवय्ये नेते असून ते महाराष्ट्रातील राजकारणाचा हिरा आहेत, असंंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तीनही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली आहे. याशिवाय तयार केलेल्या मसुद्यात शिवसेनेला पूर्णकाळ मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक-एक उपमुख्यमंत्री असतील, अशी माहिती आहे.