Maharashtra

मुख्यमंत्री शपथविधीसाठी राज ठाकरे यांना निमंत्रण

By PCB Author

November 28, 2019

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – आज शिवतिर्थावर होणाऱ्या मुख्यमंत्रीपदाची शपथविधी होणार आहे. या शपथविधीसठी उध्दव ठाकरे यांनी आपले बंधु राज ठाकरे यांना आज फोन करुन निमंत्रण दिले आहे.

राज ठाकरे यांच्या निवासस्थानापासून जवळच हे शिवाजी पार्क मैदान आहे. या शपथविधीसाठी राज ठाकरे उपस्थित रहाणार का ?

आज (दि. २८) राष्ट्रवादी पक्षाची बैठक पार पडली व उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या नाववर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज उपमुख्यमंत्री पदासाठीची शपथविधी होणार की नाही हे अजुन स्पष्ट झालेले नाही.