Notifications

मुख्यमंत्री वकील असल्याने हुशार आहेत, पण आम्हीही अभ्यास करू – अजित पवार

By PCB Author

November 27, 2018

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राज्य सरकारला सादर केलेल्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नक्की काय आहे, याची संपूर्ण राज्यातील जनतेला  माहिती हवी आहे. त्याचबरोबर धनगर आरक्षणाबाबतचा अहवाल आम्हालाही  वाचायला द्या, आम्हीही त्याचा अभ्यास करु. मुख्यमंत्री वकील असल्याने ते हुशार आहेत, मात्र आम्हीही अभ्यासाचा प्रयत्न करु,   आमच्याकडे अनुभव आहे, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. ते  विधानसभेत बोलत होते.