मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही, माझं काम बोललं पाहिजे, ते दिसलं पाहिजे

0
404

– महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची फटकेबाजी

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – महाराष्ट्रात कोरोनानं शिरकाव करून अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. या काळात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र कोरोना कसा आला आणि कोरोनाग्रस्त रुग्णांना वेगळं करण्यात कोणत्या चुका झाल्या, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरीक्षण नोंदवत भूमिका मांडली. त्याचबरोबर कोरोनाची परिस्थिती हाताळत असताना केंद्र आणि राज्यातील समन्वयाबद्दलही मुख्यमंत्र्यांनी मोठं भाष्य केलं.

महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त दैनिक ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्याचबरोबर कोरोनाचा शिरकाव होताना झालेल्या चुकांबद्दलही भाष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्च रोजी आढळला. पुण्यात हा रुग्ण आढळून आला. डॉक्टरांना वेगळी लक्षणं दिसून आल्यानंतर कोरोनाचा शिरकाव झाल्याचं कळालं. दुबईला ४० जणांचा ग्रुप फिरण्यासाठी गेला होता. त्यात हा रुग्ण होता,” असं ठाकरे म्हणाले.

“कोरोनाचा जगभर प्रादुर्भाव झालेला असताना हे महाराष्ट्रीय नागरिक दुबईतून परतले. त्यावेळी त्यांची तपासणीच झाली नाही. कारण केंद्र सरकारनं कोणत्या देशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी, याबद्दल एक यादी निश्चित केली होती. त्या यादीमध्ये दुबई आणि युएई यांचं नावच नव्हतं. खरंतर याच ठिकाणाहून सर्वाधिक बाधित नागरिक भारतात आणि महाराष्ट्रात आले. साहजिकच नंतर ते स्थानिक लोकांमध्ये मिसळून गेले आणि त्यातून कोरोना पसरत गेला. यात एक मोठी चूक जी मला वाटते, ती म्हणजे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचं होणारं स्क्रिनिंग. केवळ ताप तपासणी करणं ही चूक आहे. काही प्रवासी ताप येतोय म्हणून औषधी घेतात. त्यामुळे स्क्रिनिंग वेळी त्यांचा ताप नॉर्मल दिसून येतो. पण, कोरोनाची लक्षणं त्यांच्यात तशीच राहतात. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करणंच आवश्यक होतं. जेणेकरून प्रसार थांबवता आला असता.,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कोरोनाच्या लक्षणात पोटदुखी आहे का –
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका भाजपा नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता कोरोनाच्या लक्षणात पोटदुखी आहे का ? हे डॉक्टरांच्या टास्क फोर्सला विचारणार आहे असा टोला लगावला.

सरकार अजिबात गोंधललेलं नाही
हे सरकार गोंधळलेलं आहे अशी टीका वारंवार केली जाते असं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “जे आरोप करत आहेत त्यांनी देशातील इतर राज्यं काय करत आहेत याकडे पहावं. आपण कुठेही गोंधळलेलो नाही. दिशा ठरवून प्रत्येक पाऊल योग्य दिशेने टाकत आहोत. आपण मुंबईत तज्ञ डॉक्टारंचा टास्क फोर्स नेमला आहे. देशात असा टास्क फोर्स अजून कुठे नेमलेला नाही. टास्क फोर्समध्ये सर्व तज्ञ डॉक्टर आहे. या डॉक्टरांनी स्वत: रुग्णांवर उपचार केले आहेत. गेले दोन महिने अभ्यास करुन या डॉक्टरांनी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. रुग्ण आल्यावर त्याला काय औषध दिलं पाहिजे ? लक्षण वाढत असतील तर काय केलं पाहिजे ? यासंबंधी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत”.

“प्रशासकीय अनुभव नसल्याची टीका करणारे अनुभवसंपन्न गोंधळून आरोप करत आहेत. मी मोकळेपणाने काम करत असून मिळालेल्या सूचना ऐकत असून योग्य सूचना देत आहे, आत्मविश्वास आहे पण अजिबात गोंधळलेलो नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

चुका काढणं, दोष दाखवणं यापेक्षा बाहेर कसं पडता येईल याचा विचार करत आहे असंही यावेळी ते म्हणाले आहेत. केंद्र सरकारकडून आपल्याला योग्य त्या सूचना मिळत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. “केंद्र, आयसीएमआरकडून रोज नव्या सूचना, झालेले बदल, मार्गदर्शक तत्वे नेहमी मिळत असतात,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

माझं काम बोललं पाहिजे आणि तेच महत्त्वाचं आहे,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीने या उपक्रमाची सांगता झाली. यावेळी ते बोलत होते.

“मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही. माझं काम बोललं पाहिजे. ते दिसलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. मी दिसलो नाही तरी चालेल,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. या मुलाखतीदरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तसंच त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. “जे आमच्यावर आरोप करत आहेत त्यांनी इतर राज्यांनी काय केलं हे पाहावं. राज्य सरकार गोंधळलेलं नाही. आपण मोजून मापून पाऊल टाकत आहोत. आपण मुंबईत तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स तयार केले, असं कोणत्या राज्यानं केलं? आपल्याकडे व्हेंटिलेटर्सवर असलेले रुग्णही परत आले आहोत. करोनाच्या उपचारात औषधांचं कॉम्बिनेशन आवश्यक आहे. अनुभव संपन्न असलेले लोक आज आरोप करत आहेत. माझ्याकडे प्रशासनाचा अनुभव नसला तरी माझ्याकडे आत्मविश्वास आहे. मी बिलकुल गोंधळलेलो नाही,” असं ते म्हणाले.

शाळा सुरू करणं सध्या अवघड
“सध्या शाळा सुरू करणं अवघड दिसत आहे. अनेक पर्यायांवर चर्चा सुरू आहे. मुलांना ऑनलाइन शिक्षण देता येईल का?, किंवा शिक्षणासाठी मुलांना अधिकचा डेटा देता येईल का? यासंदर्भातही मोबाईल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे किंवा एखाद्या चॅनलवरून काही अभ्यास घेता येईल का? यावर विचार सुरू आहे. अनेक तज्ज्ञांशीदेखील यासंदर्भात चर्चा सुरू आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

त्या ठिकाणी चाचणी होणं कठिण
“सुरूवातीला आम्ही एका रूपयात अनेक प्रकारची चाचणी करण्याची योजना सुरू केली. ते सुरू असतानाचा करोनाचं संकट आलं. परंतु त्या ठिकाणी करोनाची चाचणी होणं सध्या कठिण आहे. यापूर्वी आमच्याकडे टेस्ट किट आल्या होत्या. त्या उघडण्यापूर्वी तो बोगस असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं,” असंही त्यांनी नमूद केलं.