Maharashtra

मुख्यमंत्री भाजपचाच होणार; अमित शहांचा दावा

By PCB Author

October 17, 2019

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – विधानसभा निवड़णुकीत महाराष्ट्रात शिवसेना- भाजप युतीला बहुमत मिळेल यात कोणतीही शंका नाही. परंतु भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री भाजपचा होईल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.

राज्यात शिवसेना भाजपा युती असली,  तरी मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल . तसेच उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम घेईल, असे म्हणत पुढचे मुख्यमंत्री कोण असतील याचेही त्यांनी संकेत दिले. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शहा म्हणाले की, युतीमध्ये अनेकदा कार्यकर्त्यांचा दबाव असतो. तर अनेकदा पक्षांना आपला विस्तार करायचा असतो. या गोष्टी अजिबात चुकीच्या नाहीत. लोकसभा आणि विधानसभेत शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले होते आणि विजयी झाले होते. विधानसभेतही आम्ही एकत्र लढत आहोत आणि आम्ही नक्कीच विजयी होऊ, असे ते म्हणाले.