मुख्यमंत्री ब्राह्मण असूनही मराठा समाजासाठी त्यांचे चांगले काम – विनायक मेटे

0
853

बीड, दि. ४ (पीसीबी) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. तरीही मराठा समाजासाठी त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. समाजासाठी त्यांनी विविध योजना तयार करून त्याची अंमलबजावणी केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, असे शिवसंग्राम संघटनेचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी म्हटले आहे.   

बेलगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता कामाचे भूमिपूजन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित जाहीर सभेत मेटे बोलत होते. आमदार सुरेश धस, शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते.

यावेळी मेटे म्हणाले की, राज्यात आघाडी सरकारबरोबर असताना कामे सांगूनही केली जात  नव्हती. मात्र, आता राज्यात आणि जिल्ह्यात जलसंधारण, जलशिवार, राष्ट्रीय महामार्ग यासह अनेक विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मंत्री पंकजा मुंडें यांच्या माध्यमातून   जिल्ह्यामध्ये हजारो कोटींचा विकास निधी आला आहे, असे मेटे यांनी सांगितले.