मुख्यमंत्री फडणवीस हे उत्साही आणि गतिशील नेते, पंतप्रधान मोदींच्या फडणवीसांना शुभेच्छा

0
464

मुंबई, दि, २२ (पीसीबी) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांना राजकीय, सामाजिक, आणि विविध क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे आणि सद्गुणांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्साही आणि गतिशील नेते आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी महाराष्ट्रात विकासाची नवी उंची गाठली. त्यांनी गरीबांच्या विकासासाठीही चांगले काम केले आहे. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो असे ट्विट मोदी यांनी केले आहे.

दरम्यान गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारांना आपला वाढदिवस साजरा न करण्याबाबत बजावले आहे. तसेच ज्याला वाढदिवसासाठी खर्च करायची इच्छा असेल, त्यांनी तो पैसा मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावा, असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.