मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढवणार?  

370

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. भाजपनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणूक दोन मतदारसंघातून  लढवणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर मतदारसंघातून गेल्या वेळी विधानसभा लढवली होती. यावेळी मुख्यमंत्री  मुंबईतूनही निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. नागपूर  आणि मुंबई  या ठिकाणाहून  विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची मुख्यमंत्री चाचपणी करत असल्याची  माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबईत एका सुरक्षित  मतदारसंघाचा शोध सुरू करण्यात आला आहे.  यासाठी मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघ हा सुरक्षित पर्याय  समोर आला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील  राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.