मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त स्पोकन इंग्लिशचे मोफत प्रशिक्षण

504

चिंचवड, दि, १९ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साईराम फाऊंडेशन पुणे व परशुराम युवा प्रतिष्ठाण भोसरी यांच्या संयुक्त विद्यामाने काळेवाडी येथे २२जुलै ते २१ ऑगस्ट या दरम्यान स्पोकन इंग्लिशचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नावनोंदणी साईराम रत्नम, डि मार्ट समोर काळेवाडी येथे करावी.

या प्रशिक्षणाचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना फायदा घ्यावा, असे आवाहन साईराम फाऊन्डेशन व परशुराम प्रतिष्ठाण यांनी केले आहे. तसेच सचिन पिंपरीकर ८८८८२३४५३६, डॉ. सतिश नायकिंदे ८८८८८३८००१, तसेच परशुराम युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अविनाश नाईक ९८८११२६८५७ अधिक माहितीसाठी यांच्याशी संपर्क साधावा.