मुख्यमंत्री गेली चार वर्ष एकाच वर्गात अभ्यास करत आहेत – सुप्रिया सुळे

0
714

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – मुख्यमंत्र्यांना अभ्यास करण्याची भारी हौस आहे. ते गेली चार वर्ष एकाच वर्गात अभ्यास करत आहेत. मुख्यमंत्री चर्चा करायला तयार असल्याचे म्हणाले होते. ते सांगतील तिथे चर्चेला मी तयार आहे. तुम्ही चर्चा करणार का? मी कुणाला घाबरत नाही, असे आव्हान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

इतिहासामध्ये देशात, राज्यात जितक्या शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत, तितक्या भाजपच्या कार्यकाळात झाल्या आहेत, असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला. भाजपने खरेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व खासदार तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राफेल प्रकरणावर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केल्यामुळे नाराज होऊन त्यांनी हा निर्णय घेतला. अन्वर यांनी पवारांच्या विधानाचा विपर्यास केल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.