मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर

0
198

नागपूर,दि.०८(पीसीबी) – मुख्यमंत्री आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना ते भेट देतील. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचं नागपुरात आगमन होईल. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने गोसेखुर्द धरणाकडे रवाना होणार आहेत.

गोसेखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्षी 2 हजार कोरी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचं पाटंबधारे विभाकडून सांगण्यात आलं होतं. जुलैमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यावेळी प्रकल्पाच्या पुनर्वसनाला गती देण्याची सूचना केदार यांनी दिली होती.

दरम्यान गोसेखुर्द प्रकल्पाची सुधारीत प्रशासकीय मान्यता 18 हजार 494 कोटी रुपयांची आहे. प्रकल्पाची एकूण क्षमता 1146 दलघमी आहे. तर सिंचन क्षमता 2 लाख 50 हजार 800 हेक्टर आहे. गोसेखुर्द धरणावर खासगीकरणांतर्गत 2 विद्यूत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.