Banner News

मुख्यमंत्रीपद भाजपलाच; शिवसेना मानणार उपमुख्यमंत्री पदावर समाधान

By PCB Author

July 15, 2019

मुंबई, दि, १५ (पीसीबी) – भाजपा सरकारला केंद्रात बहुमताधिक्याने विजय मिळ्याने येत्या विधानसभा निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा अंदाज युतीच्या दोन्ही पक्षाकडून बाधला आहे. मात्र मुख्यमंत्री आमचा असेल, असे उध्दव ठाकरे यांनी याबाबत खुलाशा केला होता की, ‘आमचं’ ठरल आहे मुंख्यमंत्री आमचा असेल, मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेने मुख्यमंत्री पद भाजपला सोडले असून उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानले आहे. झी 24 तास या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केला आहे.

राज्यात आता काही काळातच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. भाजप – सेना युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी , आणि इतर पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र राज्याच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या धर्तीवर भाजप सेना युतीला नक्कीच यश मिळेल असा अंदाज बांधण्यात आला आहे. त्यामुळे सत्ता तर येणार आहे, मात्र मुख्यमंत्री कोणाचा यावर अनेक दिवस दोन्ही पक्षात चर्चा होत आहे. मात्र आता शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरून माघार घेतल्याच दिसत आहे.

दरम्यान गेले अनेक दिवस भाजप सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री पदासाठी दावे केले जात आहेत. मात्र दोन्ही पक्षाच्या मुख्य नेत्यांनी याबाबत वक्तव्य करण वारंवार टाळल आहे. तरी देखील भाजप-सेनेमध्ये मुख्यमंत्री पदाचा वाद धुसफुसत असल्याच दिसत आहे.