मुख्यमंत्रिपदाची पुढील टर्म आपलीच असेल; फडणवीसांना विश्वास

0
374

लातूर, दि. ७ (पीसीबी) – पुढील टर्म ही माझीच असेल, त्यामुळे लातुरकरांनी निधीची चिंता करु नये, असे आश्वस्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) येथे केले.  आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या पुढच्या टर्मवर त्यांनी  भाष्य करून गुगली टाकली आहे.   लातुरात आज अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते. यावेळी ते बोलत होते.

लातूर शहरात हरंगुल रेल्वे स्टेशन जवळील मैदानावर अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री  फडणवीस  यांच्या हस्ते करण्यात आले.

लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयासाठी १०० कोटींचा निधी तीन टप्प्यात देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी  केली .  मात्रष पुढील दोन वर्षात हा निधी येणार आहे, काळजी नसावी, काऱण पुढील टर्मलाही मीच मुख्यमंत्री असणार आहे, असा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला.