मुकेश अंबानी ‘या’ काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात

0
634

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यामध्ये  चुरशीची लढत होत आहे. तर देवरा यांच्या प्रचारासाठी  देशातील सर्वाधिक  श्रीमंत व्यक्ती   मुकेश अंबानी मैदानात उतरले आहेत. देवरा यांनी ट्विट केलेल्या एका व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी देवरांची स्तृती करताना दिसत आहेत. ‘दक्षिण मुंबईसाठी मिलिंदच सर्वोत्तम आहे’,  असे मत अंबानी यांनी या व्हिडीओत व्यक्त केले आहे.  

या व्हिडीओमध्ये बोलताना मुकेश अंबानी यांनी ‘मलिंदने १० वर्ष दक्षिण मुंबईचे नेतृत्व केले आहे. मलिंदला दक्षिण मुंबईतील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सखोल ज्ञान आहे,’ असे म्हटले आहे. मुंबईमधील छोट्या तसेच मोठ्या उद्योगांमुळे मुंबईची भरभराट झाली आहे. आपण अधिक तरुण लोकांना येथे नोकऱ्यांची संधी देण्याची गरज आहे, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

व्हिडीओमध्ये दक्षिण मुंबईमध्ये सहा वेगवेगळ्या उद्योजकांनी आपली मते व्यकत् केली आहेत. यामध्ये रिलायन्स समुहाचे प्रमुख  मुकेश अंबानी, कोटक ग्रुपचे उदय कोटक, लघुउद्योजक क्रिश रामणानी, किराणा मालाचे दुकान चालवणाऱ्या सुषमा ताई, दुध डेअरीचे मालक फारकुद्दीन चित्तलवाला, पानाची टपरी चालवणारा राजू अशा लोकांनी मते व्यक्त केली आहेत.