मुकाई चौकातील कोहिनुर सोसायटीत अस्वच्छता

0
357

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – कोहिनुर ग्रॅन्ड्युअर हाऊसिंग सोसायटीमध्ये एकदम अस्वच्छता असते. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दिवसातून किमान चार वेळा सॅनियाटझेशन होणे अपेक्षित आहे, मात्र शौचलयासह सर्व परिसरात फक्त पाणी टाकून साफसफई केली जाते, अशी तक्रार सोसायटीमधील डॉक्टर निपुण जाधव यांनी केली आहे.

डॉ. म्हणाले, सुमारे १२० फ्लॅट आणि ६० दुकाने असलेली रावेत मुकाई चौकातील ही एक मुख्य सोसायटी आहे. प्रति महिना २५०० रुपये मेंटेनन्स चार्ज घेतला जातो. प्रत्यक्षात सोसायटी व्यवस्थापन होत नाही. सोडियम हायड्रोक्लोराईड वापरून निर्जंतुकिकरण केले पाहिजे, ते बिलकूल होत नाही. फक्त मेंटेनन्स चार्जेस पुरता विचार केला जातो, असे सांगून सोसायटी व्यवस्थापनाने हे गांभिर्याने घेतले नाही तर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करणार आहे, असे सांगितले.