Maharashtra

मुंबई महापालिकेचे ५८ हजार कोटी फिक्समध्ये मात्र तरी मुंबई पाण्यात जाते – गडकरी

By PCB Author

August 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – महापालिकेचे ५८ हजार कोटी फिक्समध्ये आहेत तरीही दर पावसाळ्यात मुंबई पाण्यात गेलेली दिसते, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे.

अंदमान आणि निकोबारनंतर देशांतर्गत भागात पहिले कांदळवन उद्यान मुंबईत तयार होणार आहे. पश्चिम उपनगरातील गोराई या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहणार आहे. याच उद्यानाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मंत्री विनोद तावडे, खासदार गोपाळ शेट्टी आणि भाजपाच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

गडकरी म्हणाले, मुंबईत पावसामुळे चांगलीच दाणादाण उडालेली पाहण्यास मिळाली. रेल्वे सेवा ठप्प झाली होती. तसेच अनेक सखल भागांमध्ये पाणीही साठले होते. या सगळ्याकडे लक्ष वेधत नितीन गडकरी यांनी महापालिकेला फिक्समध्ये असलेल्या ५८ हजार कोटींची आठवण करुन दिली. आता यावर शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.