मुंबई, पुण्यासह राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये पेट्रोल नव्वदी पार

0
426

मुंबई, दि. २४ (पीसीबी) –  मुंबई, पुण्यासह राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. पेट्रोल आज ११ पैशांनी तर डिझेल पाच पैशांनी महागले आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेली ही दरवाढीची मालिका कायम आहे. लवकरच पेट्रोल शंभरी गाठण्याची भीती सर्वसामान्यांना सतावत आहे.

आयओसीएलच्या वेबसाईटनुसार, राज्यभरातील दोन जिल्हे वगळता सगळकडे पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. तर डिझेलही ८० रुपयांच्या जवळ आहे. एकाच जिल्ह्यामध्ये काही पैशांच्या फरकाने दर वेगवेगळे असू शकतात, पण हे दर नव्वद रुपयांच्या पुढेच आहेत. देशातले सर्वाधिक महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर ३९ टक्के (+कर) वॅट वसूल केला जातो. यामध्ये विविध प्रकारच्या करांचा समावेश आहे.

दुष्काळी कर तीन रुपये, महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन तीन रुपये, शिक्षण कर एक रुपया, स्वच्छ भारत अभियानचा एक रुपया, कृषी कल्याण अभियान एक रुपया असा एकूण नऊ रुपये कर आकारला जातोय.