मुंबई-पुणे मधील गर्दी कमी कऱण्याची गरज – नितीन गडकरी

0
242

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – भविष्यात मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमधून गर्दी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून गर्दी कमी होणं आवश्यक आहे. यासाठी मुंबई पुण्याबाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं.

मुंबई पुण्यासारख्या शहरातून गर्दी कमी करण्यावर भर देणं आवश्यत आहे. तसंच मुंबई बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचेही प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी नमूद केलं. एका वाहिनीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील व्यापारात्या क्षेत्रातील उपलब्ध संधिंबाबतही माहिती दिली.

मला भाषिक अथवा प्रांतीय राजकारण करायचं नसून मुंबई आणि पुण्यातील गर्दी कमी होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूचं संकट गंभीर बनलं आहे हे आपल्याला दिसतच आहे. त्यामुळे मुंबई बाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेज उभारणं आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले. महाराष्ट्राकडे मोठी क्षमता असून करोनाच्या संकटानंतरही महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल. तसंच समुद्रात आणि नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्याचं प्रमाणही कमी झालं पाहिजे, जेणेकरून पर्यटनासाठीही लोकं येतील, असं ते म्हणाले. भविष्यात पर्यावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलमिश्रित पेट्रोलवरील वाहनं चालवण्यात यावी, असंही त्यांनी स्पष्ट केले.