मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर ट्रक उलटल्याने मुंबईकडे जाणा‌री वाहतुक ठप्प

0
512

लोणावळा, दि. २४ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटाजवळील उतारावर भरधाव वेगाणे जाणारा कंटेनर ट्रक उलटल्याने मुंबईकडे जाणा‌री वाहतुक ठप झाली आहे. ही घटना आज (सोमवार) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुंबईकडे निघालेला एक कंटेनर ट्रक खंडाळा घाटाजवळील उतरावर उलटला. यामुळे मुंबईकडे जाणारी सर्व वाहुक ठप्प झाली. पोलिसांनी मुंबईला जाणारी वाहने लोणावळा एक्झिटजवळून जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वळवली आहेत. महामार्ग पोलीस व आयआरबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून कंटेनर बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. तर ट्रकचालक थोडक्यात बचावला आहे.