Pune Gramin

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात कंटेनर उलटला

By PCB Author

September 19, 2018

लोणावळा, दि. १९ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महा मार्गावर बोरघाटात आज (बुधवारी) दुपारी पावणेतीनच्या सुमारास मुंबईच्या दिशेने येणारा एक कंटेनर पलटी झाला. या अपघातामुळे मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

या अपघातामुळे दोन मार्गिका बंद झाल्या होत्या. तिसऱ्या मार्गावरुन धीम्या गतीने वाहतूक सुरु होती. कंटेनर मुंबईच्या दिशेने येत असताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर पलटी झाल्याचे सांगितले जात आहे. हा कंटेनर हटवण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या अपघातात काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.