Pimpri

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मंगळवारी अर्धातास राहणार बंद

By PCB Author

June 24, 2019

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गवर मंगळवारी (दि.२५ जून) दुपारी एक ते दीड या वेळेत परंदवाडी येथे महावितरणची केबल टाकण्यासाठी दोन्ही लेन बंद ठेवण्यात येणार आहेत.

या कालावधीमध्ये मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्ध्यातासासाठी बंद करण्यात येणार आहे. या दरम्यान परंदवाडी (किलोमीटर ८४.४००) या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सर्व प्रकारची अवजड, मालवाहतूक करणारी वाहने थांबविण्यात येणार आहे. तर, मुंबईकडे जाणारी हलकी आणि प्रवासी वाहने ही किवळे पुलापासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वळविण्यात येणार आहेत.