मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

0
454
लोणावळा, दि.३ (पीसीबी) – आज एक्स्प्रेस वे-वर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ ट्रक आणि अर्टिगा कारला भीषण अपघात झाला. त्यात एक जण ठार तर चार गंभीर जखमी झाले आहेत.
सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता की त्यात कारचा चक्काचूर झाला. अपघाताची दृश्ये हादरवून टाकणारी होती. हा अपघात नेमका कसा झाला, याची माहिती मिळू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व अन्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.