Maharashtra

मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी; विधानसभेचे उमेदवार ठरवण्यासाठी समिती

By PCB Author

August 17, 2019

मुंबई, दि. १७ (पीसीबी) –  विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर मुंबईतील काही जागांसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे गटबाजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतील विधानसभा उमेदवार निवडीबाबत काँग्रेसने एक समिती बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

या समितीत ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे,  हर्षवर्धन पाटील,  मिलिंद देवरा,  संजय निरुपम यांचा समावेश असणार आहे. ही समिती उमेदवारीचे आलेले अर्ज, इच्छुक पाहून उमेदवारांची यादी बनवणार आहेत. प्रत्येक मतदारसंघातून तीन इच्छुकांचे नाव ठरवणार आणि ती यादी दिल्लीत पाठवणार आहे. दिल्लीत निवडणूक समिती उमेदवार निश्चिती करणार, अशी माहिती आहे.

दरम्यान, मुंबई काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मुख्य नेत्यांपेक्षा त्यांची मुले विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक दिसत आहेत. वांद्रे पश्चिम येथील जागेवर इथे बाबा सिद्दिकी स्वतः इच्छुक नाही, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. पण त्यांचा मुलगा झिसीन सिद्दिकी मात्र निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.  कृपाशंकर सिंह यांनी आपला मुलगा नरेंद्र मोहन सिंह याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केल्याचे समजते.