Maharashtra

मुंबईला अधिवेशनासाठी निघालेल्या आमदारच्या सामानाची चोरी

By PCB Author

June 25, 2019

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बुलढाण्यातील चिखली मतदार संघातील आमदार राहुल बोंद्रे यांच्या सामानासह त्यांच्या पत्नीची पर्स चोरीला गेली आहे. ही घटना सकाळी सहा वाजता विदर्भ एक्स्प्रेस कल्याण स्थानकावर घडली.

याप्रकरणी सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अधिवेशनासाठी मुंबईला येताना चोरांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सामनाची चोरी केली. त्यानंतर कल्याण स्थानकावरून राहुल बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स घेऊन चोर पसार झाला. राहुल यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोर पळून गेला. पर्समध्ये २६ हजारांची रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि महत्वाची कागदपत्रे होती. राहुल बेंद्रे यांच्या पत्नीने तात्काळ मध्य रेल्वेच्या सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांत याबाबतची तक्रार दिली आहे. सीएसएमटी पोलीस तपास करत आहेत.