मुंबईत शिवसेना आमदारा तुकाराम कातेंवर जीवघेणा हल्ला

0
323

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर शुक्रवारी (दि. १२) जीवघेणा हल्ला झाला. मानखुर्दमधील महाराष्ट्रनगर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यात तुकाराम कातेंच्या सुरक्षारक्षकासह २ कार्यकर्ते जखमी झालेत. मात्र सुदैवाने आमदार तुकाराम काते थोडक्यात बचावले.