Maharashtra

मुंबईत भाजप कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक; युतीबाबत चर्चा होणार

By PCB Author

September 26, 2018

मुंबई, दि. २६ (पीसीबी) –  आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर बुधवार (दि.२६) आणि गुरुवारी (दि.२७) दादरमधील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे उपस्थित राहणार आहेत.

आगामी निवडणुका आणि शिवसेनेसोबत युतीबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.

भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबतही आढावा घेऊन चर्चा केली जाणार आहे.  स्वबळावर किती जागा येतील, युती केल्यास किती फायदा होईल तसेच भाजपने चार वर्षांत केलेली कामे, अंतर्गत सर्वेक्षण शिवसेनेसोबत युती करण्यासाठी मन वळवण्यासाठीही प्रयत्न करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा  करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.