Maharashtra

मुंबईत बॉम्ब तयार करताना स्फोट; तपासणीमध्ये आढळले बॉल बेअरिंग, काचेचे तुकडे

By PCB Author

October 09, 2018

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – सुतळी बॉम्बच्या दारुपासून बॉम्ब तयार करणाऱ्या दोघा तरुणांना मुंबईतील अँटॉप हिल परिसरातून अटक करण्यात आली आहे. बॉम्ब तयार करत असताना झालेल्या स्फोटामुळे हा प्रकार उघडकीस आला. स्फोटात दोघांपैकी एक तरुण जखमी झाला, तर आजूबाजूच्या झोपड्यांमधील सामानही खाली पडले. स्फोटानंतर पोलिसांनी झोपडीची तपासणी केली असता त्यात बॉल बेअरिंग, काचेचे तुकडे आणि खिळे सापडले.

अरजुल शेख  (वय २२, रा. नूरा बाजार, नवाज रोड, मुंबई. मुळ.रा. पश्चिम बंगाल) असे एका आरोपीचे नाव असून दुसरा आरोपी अल्पवयीन आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अँटॉप हिल परिसरात शनिवारी रात्री जोरदार आवाज झाला होता. स्फोटाचा आवाज एक किलोमीटर परिसरात ऐकू आल्याचे रहिवासी सांगतात. स्फोटात दोघांपैकी एक तरुण जखमी झाला, तर आजूबाजूच्या झोपड्यांमधील सामानही खाली पडले. स्फोटानंतर पोलिसांनी झोपडीची तपासणी केली असता त्यात बॉल बेअरिंग, काचेचे तुकडे आणि खिळे सापडले. सर्वसाधारणपणे दहशतवादी अशा गोष्टी बॉम्बमध्ये वापरतात. सध्या हे सगळे स्फोटकसदृश्य पदार्थ तपासणीसाठी एफएसएलला पाठवण्यात आले आहेत. दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली असून एक पथक पश्चिम बंगालमध्ये पुढील तपास करत आहे.