मुंबईत बलात्कारप्रकरणी मनसे कार्यकर्त्याला अटक

0
406

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याला  बलात्कार, हिंसाचार आणि धमकावल्याच्या आरोपाखाली टिळकनगर पोलिसांनी अटक  केली आहे. सतीश वैद्य असे या कार्यकर्त्यांचे नाव आहे. तो चेंबूरमधील मनसेचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मनसे पक्षातील महिला कार्यकर्त्याने सतीश वैद्य याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

या  महिलेने टिळकनगर पोलीस ठाण्यात  तक्रार दिली होती. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर एफआयआर दाखल करुन घेतला होता. महिलेने केलेल्या आरोपानुसार, सतीश वैद्य याने आपल्याला ठाणे येथील एका हॉटेलमध्ये जेवण्याच्या बहाण्याने नेले आणि तिथे नेऊन बलात्कार केला, असा आरोप  महिलेने केला आहे.

त्यानंतर सतीश वैद्य याने जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. तर पतीला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगू अशी धमकी देत आपल्याला ब्लॅकमेल केले, असेही महिलेने  आरोपात सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सतीश वैद्य याला अटक केली आहे. अधिक  तपास सुरु आहे.