Maharashtra

मुंबईत काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची हत्या; भाजप कार्यकर्त्यांना अटक

By PCB Author

October 22, 2018

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – फेसबुक पोस्टवरुन झालेल्या वादातून मुंबईतील घाटकोपरमधील काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची हत्या करण्यात आली आहे. असल्फा परिसरात  रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास  ही घटना घडली. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

एका तरूणाने काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टवरुन फेसबुकवरच वाद सुरु झाला. त्यावरुन मनोज दुबे आणि त्याच्या ग्रुपमधील काही जणांनी टीका करणाऱ्याला समजावले. मात्र, त्यांच्यातील फेसबुकवरील वाद आणखीच चिघळला.

त्यानंतर  रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मनोज दुबे यांची हत्या झाल्याची समोर आले. हत्येचा ज्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे, ते सर्व भाजपचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहेत. मनोज दुबे आणि संशयित आरोपी एकमेकांना ओळखत होते, असेही  माहिती समोर आली आहे.  भाजप युवा मोर्चाचे नेते सुनील दुबे, उमेश सिंह, आकाश शर्मा यांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास साकीनाका पोलिस करत आहेत.