मुंबईत काँग्रेसला धक्का; आमदार कालिदास कोळंबकरांचा भाजपमध्ये प्रवेश

0
504

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत  भाजपचे कमळ हाती घेतले आहे. कोळंबकरांनी  दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी  पाठिंबा देत असल्याचे यावेळी जाहीर केले.

भाजप प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना कोळंबकर म्हणाले की, मी काँग्रेसवर नाराज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले,  म्हणून मला पक्षाने बाहेर केले आहे. दक्षिण मध्य मुंबईतून युतीचे उमेदवार राहुल शेवाळेच विजयी होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वासही  त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले  आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत.