मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरू करणार

0
189

लखनऊ, दि. १० (पीसीबी) – मुंबईसध्ये आता उत्तर प्रदेश सरकाराचं कार्यलय सुरू होणार आहे. मुंबईमध्ये राहणा-या उत्तर भारतातील लोकांना मदत करण्यासाठी मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

मुंबईंमध्ये सुमारे ५० ते ६० लाख उत्तर भारतीय राहतात. या लोकांना येणा-या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत व्हावी यासाठी उत्तर प्रदेशसरकारने हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्यामुळे मुंबईत राहणा-या लाखो उत्तर भारतीय मजुरांची प्रचंड अडचण झाली होती. आता अश्या प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास मुंबईतील कार्यालयाच्या माध्यामातून उत्तर प्रदेश सरकार त्या लोकांना मदत करेल. ज्या प्रमाणे प्रत्तेक देशात इतर देशांच्या दुतावासांचं कार्यालय असतं आणि ते ज्या पद्धतीनं काम करतं त्याच पद्तीनं हे कार्यालय स्थानिक पातळीवर काम करणार असल्याचं सांगितलं जातंय.