Maharashtra

मुंबईत आमदाराची बॅग चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक

By PCB Author

June 27, 2019

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – बुलढाणा जिलह्यातील आमदार राहुल बोंद्रे यांची कल्याण रेल्वे स्थानकातून बॅग पळविणाऱ्या चोरटय़ाला कल्याण, भायखळा पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी (दि.२५) सकाळी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली.

अहमद हबीबअली सय्यद (रा. कल्याण, दत्तमंदिर झोपडपट्टी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आमदार बोंद्रे हे अधिवेशनासाठी पत्नीसह रेल्वेने मुंबई दाखल झाले होते. कल्याण रेल्वे स्थानकावर एका चोरट्याने त्यांची बॅग चोरली. बोंद्रे यांच्या पिशवीत ५१ हजार रुपये रोख, पॅनकार्ड, मोबाइल व इतर दस्तऐवज होते. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चित्रण चित्रित झाले होते. चित्रणात आरोपीची माहिती पोलिसांनी जमा केली. तो कल्याण पूर्वेतील दत्तमंदिर झोपडपट्टीतील अहमद हबीबअली सय्यद असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्या घरी गेल्यावर तो नाशिक येथे गेल्याची माहिती मिळाली. तो तेथून कल्याण रेल्वे स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.