मुंबईतून दिल्लीला आलेल्या शास्त्रज्ञालाच कोरोना

0
251

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संस्थेच्या मुख्यालयाची संपूर्ण इमारत निर्जंतूक करण्याचे काम सुरू आहे.

मुंबईतील हे शास्त्रज्ञ काही दिवसांपूर्वीच दिल्लीला आले असून रविवारी सकाळी त्यांना लागण झाल्याचे आढळले. गेल्या आठवड्यात या शास्त्रज्ञाने एका बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीला आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांच्यासह अन्यजण उपस्थित होते. या शास्त्रज्ञाला लागण झाल्याचे आढळल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करोना लढ्यातील महत्त्वाच्या पथकाने गरज असेल तरच मुख्यालयात यावे, असे प्रशासकीय कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.