Maharashtra

मुंबईतील 3000 रुग्णवाहिका गेल्या कुठे ? भाजप प्रदेश उपाध्क्ष किरीट सोमैया यांचा संतप्त सवाल

By PCB Author

May 21, 2020

– खाजगी एम्ब्युलन्स मालकांवर मेडिकल इमर्जन्सी अंतर्गत कारवाई का नाही? – एमब्युलन्स मालकांवर ठाकरे सरकारचा वरदहस्त का?

मुंबई, दि. २०, (पीसीबी) : कोरोना महामारीच्या या भयंकर संकटात मुंबईतील रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी 5 ते 15 तास मोजावे लागत आहेत. 20 मार्चपर्यंत मुंबई आरटीओकडे रजिस्टर असलेल्या 2920 खाजगी एमब्युलन्सेस सेवा देत होत्या पण गेल्या दोन महिन्यांपासून अचानक गायब झाल्या आहेत. मेडिकल इमर्जन्सी अंतर्गत ठाकरे सरकारने खासगी एम्ब्युलन्सच्या मालकांवर का कारवाई करत नाही, असा संतप्त सवाल भाजप नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे. याबाबात 5 एप्रिल 2020 ला आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले होते. मात्र अद्यापही पेशंटला यासाठी झगडावे लागत आहे. दीड महिन्यानंतरही राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली नाही. 108 क्रमाकांच्या सेवेवर निव्वळ 93 रुग्णवाहिका सध्या कार्यरत आहे. देशात आणि राज्यात असलेल्या मेडिकल इमर्जन्सी अंतर्गत महापालिका आणि राज्य सरकारने ब-यापैकी आपला वापर केला आहे. मग खाजगी रुग्णवाहिका मालिकांवर कारवाई का नाही याबाबत स्पष्टता असायला हवी, असेही सोमय्या यानी म्हटले आहे.