मुंबईतील व्यापारी हत्येप्रकरणी ‘या’ टीव्ही अभिनेत्रीला अटक

0
1852

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – मुंबईतील व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवार याला आज (शनिवार) अटक केल्यानंतर  प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

देवोलिना ही सचिन पवारसोबत गुवाहाटी येथे होती. मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले होते. देवोलिना हिचा राजेश्वर उदानी यांच्या हत्या प्रकरणात नेमका काय संबंध काय आहे?    याची चौकशी करण्यासाठी तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  देवोलिना हिने ‘साथ निभाना साथिया’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेत काम केले आहे. गोपी बहु हे तिचे पात्र सर्वाधिक लोकप्रिय झाले होते.

दरम्यान, ५७ वर्षीय राजेश्वर उदानी २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. याबाबत उदानींच्या नातेवाईकांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ४ डिसेंबरला पनवेल पोलिसांना नेरे गावातील जंगलात एका एक अनोळखी मृतदेह दिसून आला होता. हा मृतदेह व्यापारी राजेश्वर यांचाच असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी  कपडे आणि बेल्टवरुन ओळखले होते.