Maharashtra

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ३० व्या मजल्यावरुन उडी घेत जीएसटी अधीक्षकाची आत्महत्या

By PCB Author

May 14, 2019

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – जीएसटी अधीक्षक हरेंद्र कपाडिया (वय ५१) यांनी मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतीच्या ३० व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास घडली.  

हरेंद्र कपाडिया जीएसटी अधीक्षक म्हणून मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये काम पाहत होते. ८ महिन्यांपूर्वी हरेंद्र कपाडिया यांना ब्रेनस्ट्रोक आल्याने ६ महिने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. २ महिन्यांपूर्वी हरेंद्र कपाडिया यांनी कार्यालयात जाण्यास सुरुवात केली होती. कामावर असताना कपाडिया मानसिक तणावाखाली वावरत असल्याचे सहकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहे. या संदर्भात पोलिसांनी कार्यालयातील सहकाऱ्यांचे जवाब नोंदविले असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.