मुंबईतील लालबागचा राजा गणेश मंडळावर सरकारी नियंत्रण

0
835

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – कार्यकर्त्यांची मुजोरी, व्हीव्हीआयपींची अरेरावी आणि सर्वसामान्य भाविकांची होणार परवड रोखण्यासाठी प्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारी नियंत्रण आणण्याचा निर्णय  धर्मादाय आयुक्तांनी घेतला आहे. या मंडळाविरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.

या निर्णयामुळे लालबागच्या राजावर आता सरकारचे नियंत्रण राहणार आहे. पारदर्शक कारभारासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती दर्शन रांगेबाबात धोरण ठरवणार आहे. तसेच लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात येणाऱ्या पैसे, दागिने आणि मौल्यवान गोष्टींची मोजदाद धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर भाविकांच्या रांगा कशा असाव्यात, कोणाला प्राधान्य देण्यात यावे, किंवा मिळू नये. आदी सर्व प्रकारावर धर्मादाय आयुक्तांची समिती देखरेख  ठेवणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांच्या मुजोरपणाला  आळा बसण्याची शक्यता आहे.