मुंढेंच्या धास्तीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीत सुधारणा

0
371
नाशिक, दि.२८ (पीसीबी) – २८ जानेवारी रोजी तुकाराम मुंढे यांनी नागपूर मनपाचा कार्यभार स्वीकारला. आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी आपल्या कामांची सुरूवात केली. कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही त्यांची धास्ती घेतली असून त्यांनीदेखील वेळेत येण्यास सुरूवात केल्याचे समोर आले आहे.
त्यानंतर त्यांनी जोमानं कामाला सुरूवात केली होती. तुकाराम मुंढे यांनी रूजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लेखा आणि वित्त विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या विभागात कार्यरत असलेल्या चार कर्मचाऱ्यांना दणका देत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले होते. आपल्या कामात अनियमितता केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला होता. तसंच दुसऱ्या दिवसापासूनच तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिका क्षेत्रातही जनेतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार सुरू केला. तसेच त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेण्यास सुरूवात केली.
तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ते एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांची एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. तुकाराम मुंढे हे नागपूर महानगरपालिकेत येणार हे कळल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी धसका घेतला होता. तसंच अनेक कर्मचारी वेळेपूर्वी कार्यालयात हजर राहत असल्याचेही समोर आले होते
लवकरच आणखी १०० टँकर्स बंद करण्याचा महापालिकेचा मानस आहे. वांजरा येथील जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू झाल्यावर कामठी मार्गावरील उप्पलवाडी, शिवनगर, धम्मदीपनगर, डायमंडनगर, हस्तीनापूर, बंधू सोसायटी, भीमवाडी आदी भागातील नागरिकांना नळ जोडण्या देण्यात येणार आहेत. यामुळे या भागातील टँकर्सच्या ६० ते ७० फेऱ्या कमी होतील. याशिवाय नारा व कळमना भागातील जलकुंभाचे काम झाल्यावर तेथील टँकरही बंद केले जाणार आहेत.